मनाचा ढग नाहीसा करणे..
मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न हा नेहमीचाच।शात्रज्ञ,मनोविज्ञानिक,संत,योगी,यांनी निरंतर वेध घेतलाय.अनेक केंद्र कळली पण मनाचे अस्तित्व कुठे हे कळले नाही. मन मायावी,मनाचे खेळ,असे साधुसंत म्हणताना आपण ऐकतो.मायावादाचा जन्मही त्यातूनच.मन आपल्यासमोर भास निर्माण करते,मनाचे समाधान कधी होत नाही,मनाचे दमन करायचे हे सुद्धा मनच ठरवते.ते प्रयत्नसाध्य झाले की नाही हे मनच ठरवते.रुपगुणांचा पसारा हे मन दाखवते.मनाला अस्तित्व नाही.तो कोणत्यातरी गतीचा परिपाक आहे असे असूनही ते आपल्याला अस्तित्व आहे असे भासवून ते आपल्यावर प्रभुत्व गाजवत असते.शरीर हे कर्मेंद्रियाच्या कक्षेत, आणि क्रिया घडवून आणण्यासाठी ज्ञानेंद्रिये.ही दोन्ही हातात हात घालून कार्य करतात त्यांना वेगळे काढता येत नाही.या दोन्हीला क्रियाशील करण्यासाठी गतिशील करण्यासाठी विचार,भावना,कल्पना,यांचे त्रिकुट.जे जन्मापासून आपल्याला प्राप्त झाले आहे.या त्रिकुटाच्या खेळात आपण मन ही संज्ञा वापरून त्यात अडकत जातो.थोडीफार अंतर्मुखता आल्यावर या तीन पैकी एकाची जरी गती आपल्याला थांबवता आली तरी इतरांची गती थांबते.मनाला समजून घेणे,मनाच्या तालावर नाचणे, मनाला येईल ते करणे,मनाला शांत करणे, मनावर ताबा मिळवणे,मनाचे खेळ खेळणे हे आपण म्हणतो म्हणजे काय ? मन मुळात फसवे आहे. तेच मायावी असल्याने त्याची मदत म्हणजे आपली फसवणूक.म्हणून मनावर साचलेले ढग. ते स्वच्छ झाल्यावर जेव्हा जाणिवेच्या कक्षेत आपण येतो तेव्हा त्याचे खरे स्वरूप प्रकट होते.असे योगी,संतजन सांगतात.आणि तिथून खऱ्या वेधाला सुरुवात होते.
मन नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा खऱ्या आनंदाची अनुभूती येते.काहीतरी छान आहे,मस्त आहे,चैतन्यपूर्ण आहे।पराकोटीची शांतताललl आहे समाधान आहे.सतचिदानंद स्वरूप आहे हे उमगते.पण ही प्रक्रिया खूप खोल आणि अथांग आहे.वरवर समाधान ,आनंद वाटणे असे यातील भास नाहीत.त्या अनुभूतित चोवीस तास त्यात रहावे असे वाटते.बाह्य जीवनाचे आकलन होण्यासाठी एकदा डोळे उघडले की की पुरेसे असते.मग आपोआप ते मिटले जातात.मुळात डोळे उघडणे हेच महाकठीण.योगीजनांना साधनेने ते प्राप्त होते.
स्वस्थ (ऐहिक दृष्ट्या नव्हे) राहून मन अंतर्मुख करणे आवश्यक असते.इथून पुढे योग्य आकलनाची प्रोसेस चालू होते.त्यातही चुकीचे थर्माममीटर लावले जातात.त्यामुळे सुयोग्य सद्गुरूकडून मार्गदर्शन घेणे,त्यास शरण जाणे हा एकमेव उपाय.
मृणाल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा