मन मोकळे करुया
माझ्या मनाच्या घरात
सारी स्वप्नांची खेळणी
चार भिंतीत तयांशी
माझी होतात बोलणी
नसे आवाज तयांचा
नसे कुणालाही त्रास
त्यात किती अडकले
रंगभरे मधुमास
आपल्याच घरामध्ये
आता नांगर फिरतो
करू नवे नवे घर
गोळा पोटचा सांगतो
आता नवे प्राणी,पक्षी
कुठे ठेवू हे जुनेरे
जीव अडकला त्यात
घर वाटते सुने रे
वाटे हवेसे आकाश
मन मोकळे करूया
माझ्या स्वप्नांचे हे घर
आता तिथेच बांधुया
©विनिता/मृणाल घाटे,पुणे.
माझ्या मनाच्या घरात
सारी स्वप्नांची खेळणी
चार भिंतीत तयांशी
माझी होतात बोलणी
नसे आवाज तयांचा
नसे कुणालाही त्रास
त्यात किती अडकले
रंगभरे मधुमास
आपल्याच घरामध्ये
आता नांगर फिरतो
करू नवे नवे घर
गोळा पोटचा सांगतो
आता नवे प्राणी,पक्षी
कुठे ठेवू हे जुनेरे
जीव अडकला त्यात
घर वाटते सुने रे
वाटे हवेसे आकाश
मन मोकळे करूया
माझ्या स्वप्नांचे हे घर
आता तिथेच बांधुया
©विनिता/मृणाल घाटे,पुणे.