सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

 तुझी नि माझी प्रेमकहाणी फुलत रहावी

मदिर क्षणांची नशा अनोखी चढत रहावी

युगायुगांनी लांबत जावा मिठीतला क्षण

प्रितीची गाणी झुल्यावरती झुलत रहावी


विनी...

 ठाऊक झाली जगास साऱ्या 

तुझी नी माझी प्रेमकहाणी

कधी कुणाला कळली नाही...

मंतरलेली अबोल गाणी


विनी...