नवी पिढी
आई पुजा करणं होणार नाही हं आम्हाला,
उगीच ते देव, देवघर,समई,साहित्य कशाला ?
असावं ग घरात,श्रद्धा हवी.positivity असते ती,
ती आधी मनात हवी.अशी कोपऱ्यात बसून नसते मिळत.(मी गप्पच)
.बरं.....बाप्पाची मोठी फ्रेम दिलीय ती लाव,
आणि उदबत्ती लावत जा रोज.
हं, ठीक ते करेन, लक्षात राहीलं तर.
आजकाल ऐकत नाहीत ही मुलं.
एका कोपऱ्यात ठेवलेल्या देवाला ती मानत नाहीत.
तुम्हीच म्हणता चराचरात आहे,मग असा बांधून कशाला ठेवता ?
राहू दे न त्याला space मध्ये.
(आपला बौद्धिक क्लास )
अग,space मध्ये आहेच तो,आपल्याला शांतता लाभावी अंतरात म्हणून करावं,
ध्यान करावं,आरती करावी.संध्याकाळी शुभंकरोती, छान असतं ग ते घरासाठी, माणसांसाठी.संस्कार आहेत आपले, परंपरा आहे ती.आपल्या सभोवताली एनर्जी असते,जी आपलं रक्षण करते.आत्मिक शांतीसाठी.
म्हणजे मग तुमची ही टेंशन्स असतात ना त्याचा त्रास होत नाही,depression येत नाही.
देवाची पूजा करायची आणि घरातल्या माणसांवर रागवत बसायचं,देवाची उपकरणं धुतली नाहीत,देवघर स्वच्छ केलं नाही.प्रसादात हे केलं नाही,ते झाले नाही,
करणाऱ्या बाईला काडीची किंमत नाही.ती राबराब राबते.थॅंक्यू पण नाही.मग कशाला ? कुठे आहे तो देव ? कृष्ण ? येतो का जेव्हा बलात्कार होतो.तुमची द्रूपदी जुनी झाली आता.सीता तर फारच outdated.
राजकन्या होत्या,पण नशिबी काय ?बाईला
जेव्हा मारझोड होते,उभी जिवंत जाळतात,
नको नको तो त्रास देतात तुमच्या परंपरा आणि रूढी,तेव्हा देव कुठे असतो ? भोग कुणी लावले मागे ?
तुमच्यासारख्या अबलांनी.आम्ही अबला नाही आहोत.
तुम्ही जे भोगलंय ते आम्हाला नकोय.काही सांगू नकोस.
मी नाही ठेवणार देव घरात,पुरुषी अहंकार बळावतो आणि पुरुष बाईला गृहीत धरतात.शेवटी देव ही मनाची संकल्पना आहे.मी मनात करेन.मी ध्यान पण करेन.योग करेन,खऱ्या ज्ञानाचा अभ्यास करेन.एकवेळ मोबाईलवर दासबोध,ज्ञानेश्वरी वाचेन पण ते खोटे खोटे पूजा तंत्र नको.
तुम्ही करताय ना पूजा ? पुरे आहे ते,अवडंबर नको.( मी अवाक )
विज्ञानयुगात ज्ञान महत्वाचं.आपण या मुलांना का जुंपत आहोत ? त्यांनी आपल्यासारखे विचार करावे
असे आपण का ठरवायचे ? मुलगी म्हणाली त्यावरून आपण चुकीचे संस्कार करत नाही आहोत याची जाणीव झाली.
आणि देवाला दिवा लावायला आत जाताना स्वतःशीच हसले वेगळ्याच समाधानाने.
©मृणाल घाटे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा